Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रएनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र

एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र

प्रतिनिधी (रमेश औताडे) : नरीमन पाॅईंट, मरीन लाइन्स समुद्रालगत एकूण ८ एकर जागेवर वसलेले एनसीपीए हे सामाजिक बांधिलकी जपणारे केंद्र आहे. ” संस्था भेट चर्चा थेट ” या उपक्रमाव्दारे एनसीपीए कलादालने तसेच लायब्ररी भेट व त्याची माहिती जाणून घेण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी नयन कळे , मुख्य ग्रंथपाल सुजाता जाधव यांनी तसेच रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या संकल्पनेतून कलाकार तसेच वाचकांसाठी असलेली सामाजिक बांधिलकी टाटा थिएटर, जमशेद भाभा थिएटर, एक्सप्रिमेंटल थिएटर, गोदरेज डान्स थिएटर, लिटील थिएटर, दिलीप पिरामल प्रदर्शन गॅलरी, एनसीपीए रेकाॅर्डींग स्टुडिओ इतर ची वैशिष्ट्ये, आसन क्षमता, विद्युत व्यवस्था, श्रोत्यांसाठी ध्वनी व्यवस्थापन, एनसीपीए आर्ट ॲट द पार्कची सामान्य नागरिकांसाठीची संकल्पना ही महत्वपूर्ण आहे.अशी माहिती नयन काळे यांनी दिली.

लायब्ररीतील पुस्तकांची नियोजनबद्ध मांडणी,संदर्भित वास्तु विशारद पुस्तके,विविध संगीत क्षेत्रातील इसवी सनातील माहिती,सभासद नोंदणी प्रक्रिया,सभासदांना मिळणार-या सुविधांची माहिती सुजाता जाधव यांनी दिली. रूग्ण मित्र परिवार तथा सहयोगी संस्थेच्या साधारण ३५ हून अधिक संस्था पदाधिका-यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवली. एनसीपीएच्या भेटीत मिळालेली माहिती सामाजिक संस्था पदाधिका-यांनी मौखिक प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही दिली.

एनसीपीए व्यवस्थापनाच्या उत्तम नियोजनातून भेटीचा हेतू सफल झाल्याचे धनंजय पवार, नवीन कुमार पांचाळ, रमेश चव्हाण, श्रुती साडविलकर या समन्वयकांनी आपले मत व्यक्त केले. नयन काळे व सुजाता जाधव यांचा शाल व रुग्ण मित्र संस्था भेट चर्चा थेट तथा वैद्यकीय मदत पुस्तक देऊन नागेबाबा मल्टिस्टेट पतसंस्थेचे आरोग्य दूत सुभाष गायकवाड़ यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

संस्था भेटीत पूर्वा कदम, बाळकृष्ण नाणेकर, प्रदीप कुलकर्णी, अमिता शर्मा, सी.पी.पावसकर, गोविंद मोरे, प्रविण खेडेकर, प्रज्वला इंगळे, शांताराम मोरे, रूपाली कापसे, अक्षता कापसे, रोहन पालकर, एस.पी.जहागीरदार,अमेय गिरकर, छाया भटनागर, वैष्णवी शिंदे, अन्वी भटनागर, आद्या भटनागर,डाॅ.स्मिता तरे, डाॅ.अलका थरवळ, मिनाक्षी वेलणकर, आदिती गायकवाड, सुभाष गायकवाड, डी.डी.सावंत, रेहाना शेख, अख्तर हुसेन यांनी सहभाग घेतला.

.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments