भोसे(रविकांत बेलोसे) : आपल्या सभोवतालच्या समाजातील रुग्णांना लागणाऱ्या आरोग्य सेवा देण्यासाठी आपण प्रमाणिक प्रयत्न करणार असून पांचगणी या आपल्या मातीतील आरोग्य केंद्राला सर्व कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वोच्च पदावर नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मिथिला समीर बेलोशे यांनी केले.
पांचगणी या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य अधिकारी डॉ. कदम यांची बदली झाल्याने या पदावर
जावळी तालुक्यातील रुईघर गावच्या स्नुषा सौ. मिथिला समीर बेलोशे या हजर झाल्या. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. मिथिला बेलोशे यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले यावेळी डॉ. बेलोशे बोलत होत्या. यावेळी डॉ. धनश्री गोळे उपस्थित होत्या.
डॉ. बेलोशे पुढे म्हणाल्या पांचगणी सारखी आरोग्य केंद्रात काम करण्यासाठी मोठे आव्हान आहे. जवळची माणसे, आपल्या भूमीतील पेशंट त्यामुळे काम करताना मोठीं कसरत करावी लागणार आहे. याची जाणीव असल्याने मोठ दडपण आहे पण आपली माणसं, कर्मचारी वर्ग यांच्या मदतीने सर्वांना बरोबर घेऊन आपण आपला समाज निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले.
यावेळी डॉ धनश्री गोळे यांचे हस्ते डॉ मिथिला बेलोशे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांचगणी आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. डॉ धनश्री गोळे यांनी सर्वांचे स्वागत केले.
पांचगणी : डॉ. मिथिला बेलोशे यांचा सत्कार करताना डॉ . धनश्री गोळे शेजारी इतर कर्मचारी (रविकांत बेलोशे सकाळ छाया चित्र सेवा)