Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी मनसेच्या वतीने पाणी वाटप

धारावीत मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी मनसेच्या वतीने पाणी वाटप

प्रतिनिधी :धारावीमध्ये रामनवमीचा सण यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. वज्रदल तसेच भारतीय जनता पार्टी आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने धारावीतील मुख्य रस्त्यावर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीस अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या रस्त्यावर रामभक्तांनी एकत्र येऊन प्रभू श्रीरामाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता.

मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उन्हाच्या तडाख्यात सहभागी नागरिकांना दिलासा मिळाला.
संपूर्ण धारावीमध्ये रामनवमीच्या दिवशी भक्तीमय वातावरण होते, विविध मंदिरांत विशेष पूजन, भजन आणि प्रसाद वाटपाचे आयोजनही करण्यात आले होते.

धारावी विधानसभा येथे रामनवमीच्या निमित्ताने आज भव्य दिव्य अश्या रामनवमी शोभयात्रा च्या वेळी पाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असताना राजेश सोनवणे,कौशिक कोळी, समीर भोईटे, संदिप कदम, नितीन दिवेकर, जिगर मोरे, तसेच सुरेखा भागत,भक्ती तिखे व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments