Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रन्हावा गावदेवीची भव्य यात्रा २४ एप्रिललागावक-यांकडून जय्यत तयारी;यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर...

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा २४ एप्रिललागावक-यांकडून जय्यत तयारी;यात्रेचा लाभ घेण्याचे अशोक भोईर यांचे आवाहन

मुंबई(शांत्ताराम गुडेकर) : देवाप्रति श्रद्धा ज्यांच्या मनात वास्तव्य करते अशा व्यक्तीना आपण आस्तिक म्हणून ओळखतो,खरे पाहिले तर मनात भाव व देवापरी भक्ती मनापासून जोपासली तर मनुष्याच्या ह्दयातच देवाचे स्थान आहे.असे म्हटले जाते.या बाबी श्रद्धाळू माणसांना पटण्याजोगा नसतात.म्हणूनच ते जेथे देवाचे मंदिर आहे तेथेच देव दर्शनाला जातात.देशभरात अनेक तीर्थक्षेत्र आहेत.त्यातही महाराष्ट्रात तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे.या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे.एन.पी.टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा नावाचे गाव आहे.न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
या गावाधील गावदेवीची यात्रा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष-१ बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.तसेच पालखी सोहळा गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे.गावामधील ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी झाली आहे.ग्राम सुधारक मंडळाचे गजानन पांडुरंग म्हात्रे -अध्यक्ष,जयेंद्र जनार्दन पाटील -उपाध्यक्ष, निलेश हरिश्चंद्र भोईर -उपाध्यक्ष, प्रेमनाथ नामदेव म्हात्रे -उपाध्यक्ष, सतीश दत्ताराम भोईर -उपाध्यक्ष, विनोद एकनाथ पाटील -खजिनदार, अनंत लहु म्हात्रे -सहखजिनदार, सदानंद जगजीवन पाटील -सहखजिनदार, विशाल लक्ष्मण ठाकूर, -सहखजिनदार.विजेंद्र गणेश पाटील -सरपंच ,राजेश गणेश म्हात्रे -उपसरपंच ,ग्रामसुधारक मंडळ न्हावे, कमिटी आणि सदस्य, सभासद तसेच संबंधित अन्य पदाधिकऱ्यांनी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई,ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे.ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात.गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पहावे.असे आवाहन पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक दामू भोईर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments