प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त पाटण तालुक्यातील लोटळेवाडी (काळगांव) येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रम (मठ) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मठामध्ये सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट चे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सोमवार दि.31 मार्च, 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत महिलांकरिता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी डाॅ.सौ.सारिका गावडे, काळगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.राखीताई काळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यानंतर माजी विश्वस्त स्त सदस्यांचा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला आहे. यासाठी प्र.प्राचार्य ए.बी.कणसे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, मा.सुभाषराव बावडेकर, मा.वसंतराव शिरसट व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय श्री स्वामी समर्थ सेवा सांप्रदाय ट्रस्ट ला स्थापनेच्या काळात ज्यांनी मोलाचे योगदान दिले परंतू सद्या ते हयात नाहीत त्यांच्या कुटूंबीयांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. यामध्ये कै.तुकाराम ल.कदम, कै.पांडूरंग रा.आस्कट, कै. विठ्ठल धों.मस्कर, कै.वसंत कि.मानूस्करे , इ.सदस्यांच्या कुटूंबियांचा समावेश आहे.
या ट्रस्टची स्थापना सन 2001 मध्ये श्री दत्त मंदीर मानखुर्द मुंबई येथे झाली. सन 2003 साली लोटळेवाडी (काळगांव) येथे कै. भागाबाई हरिबा लोटळे यांनी दान केलेल्या जमिनीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवाश्रम मठाचे संत संमेलनाच्या माध्यमातून भूमिपूजन करण्यात आले. सेवाश्रम मठास कळस लागेपर्यंत तब्बल सहा वर्षे अनवाणी पायांनी राहून नऊ स्वामी सेवेकरी वर्गाचा दृढ संकल्प पूर्ण झाला. त्यानंतर अथक परिश्रमातून २००९ ला मठाचे कलशारोहन व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. मठातील पादुका या अक्कलकोट मधील वटवृक्षाच्या फांदीच्या आहेत. पाटण तालुक्यातील वांगखोऱ्यात श्री स्वामी समर्थांचा हा एकमेव मठ असून संजय देसाई यांचे माध्यमातून भाविक भक्तांकरिता मंडपाची उभारणी केली आहे. याशिवाय सन 2017 पासून मुंबई तसेच उपनगरात श्री स्वामी समर्थ नामस्मरण व आरती सोहळा महिन्यातील दोन रविवार अखंडित सुरु आहे.
ग्रामीण भागातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शैक्षणिक मदत, वेळोवेळी मोफत आरोग्य शिबीर राबवून गरजूंना मदतीचा हात, अनेक ठिकाणी मंदिरांना मुर्ती देऊन विशेष सहकार्य, अल्प दरात सेवेकरी वर्गास अक्कलकोट दर्शन यात्रा (वार्षिक), शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील एका गरजु कु.स्वरांजली कृष्णत यादव या मुलीला ऑपरेशन करिता वैद्यकीय मदत ट्रस्टचे वतीने करण्यात आली आहे.
तरी स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, श्री स्वामी समर्थ पादुका मिरवणूक, हळदीकुंकू समारंभ, विशेष सन्मान, हरिपाठ, किर्तन, महाप्रसाद आदी सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने संस्थापक/अध्यक्ष सुरेश नि.मस्कर यांनी केले आहे.