Saturday, August 23, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न;नवी मुंबई मनपाचा उपक्रम

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक खाजगी डॉक्टरांची कार्यशाळा संपन्न;नवी मुंबई मनपाचा उपक्रम

नवी मुंबई :

२४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग विषयी व्यापक जनजागृती करणेकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

क्षयरोगाचे निर्मूलन करणेकरीता शासकिय व खाजगी आरोग्य सेवा यांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे. त्याच धर्तीवर नमुंमपा आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत National Integrated Medical Association (NIMA) यांच्या संयुक्त विद्यामानाने खाजगी AYUSH वैदयकिय व्यवयायिक यांची क्षयरोग विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळे करीता आरोग्य विभागामार्फत वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रविण कटके, वैदयकिय अधिकारी डॉ. निनाद काकडे, डॉ. प्रदिप परदेशी व NIMA अध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे व एकूण 54 खाजगी AYUSH वैदयकिय व्यवयायिक उपस्थित होते.

वैदयकिय आरोगय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी AYUSH वैदयकिय व्यवयायिक ना संबोधित केले व त्यांना क्षयरोग आजाराचे दुरीकरण करणेकरीता बाह्यरुग्ण विभागामध्ये येणाऱ्या जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांची तपासणी करून घेण्याचे अवाहन केले. शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रविण कटके, वैदयकिय अधिकारी डॉ. निनाद काकडे व डॉ. प्रदिप परदेशी यांनी उपस्थित डॉक्टरांना नमुंमपा अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम मार्फत देण्यात येणाऱ्या विविध मोफत निदान, औषधोपचार व प्रतिबंधात्मक उपचाराबाबत सेवेची माहिती दिली. NIMA अध्यक्ष डॉ. विनायक म्हात्रे यांनी क्षयरोग विषयक कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल नमुंमपा आरोग्य विभागाचे विशेष आभार व्यक्त केले.

नमुंमपा, खाजगी संस्था व नागरिक एकत्रित आल्यास नवी मुंबईतून क्षयरोगाचे समुळ उच्चाटन करणे शक्य आहे. तरी नवी मुंबई क्षयरोग मुक्त करणेकरीता खाजगी संस्था व नागरिकांनी सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments