कराड(विजया माने) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण व कोरेगाव तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या. निवडीनंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महीला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यावेळी, जिल्हा सचिव शिवाजी चव्हाण, कराड दक्षिण तालुका अध्यक्ष भानुदास डाईंगडे, बंटी मोरे, दादा कावरे, बळीराम कुंभार, जय शिंदे, प्रितेश माने, शुभम पाटील, विराज देशमुख, आकाश पिसे, आकाश जाधव, सुहास आगरकर, सुरेश कांबळे, विशाल दबडे, महेश शिंदे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मनीषा चव्हाण (निसरे) यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपजिल्हाध्यक्षपदी स्वाती माने (नांदलापूर) व निर्मला पाटील (चाफळ) यांची निवड करण्यात आली.
कराड दक्षिण तालुकाध्यक्ष पदी वैशाली देवकर (किरपे), कराड उत्तर तालुका अध्यक्षपदी रत्नप्रभा निमट (कवठे), पाटण तालुकाध्यक्ष पदी
वंदना जाधव ( चोपडी), कोरेगाव तालुका अध्यक्षपदी रेणुका राजे (लासुरने), उपतालुका अध्यक्ष पाटण सुमन पवार ( तामखेड), पाटण शहराध्यक्ष माधुरी बावधने ( पाटण), कराड दक्षिण उप तालुकाध्यक्ष मुमताज मकानदार (घोगाव) आक्काताई ढेबे, नंदा शिंदे ( कालवडे), कराड उत्तर उप तालुकाध्यक्षपदी योगिता कुंभार (कवठे), कोरेगाव उप तालुकाध्यक्षपदी रोहिणी मुंडे (तांदुळवाडी), कोरेगाव उप तालुकाध्यक्षपदी विना काटे (एकसळ), शहराध्यक्ष कोरेगाव पूजा जाधव ( कोरेगाव), पाटण उप तालुकाध्यक्षपदी वर्षा पवार (चाफळ) यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा मनोज माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मनोज माळी म्हणाले की, बच्चूभाऊ हे चळवळीतील कार्यकर्त्यांला ताकद देणारे नेते आहेत. समाजासाठी काम करताना आपणाला प्रहारच्या माध्यमातून संपूर्ण पाठबळ देण्यात येईल. त्यामुळे महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला व कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मनोज माळी म्हणाले.
फोटो – महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी मनोज माळी, शिवाजी चव्हाण,भानुदास डायगंडे, मनीषा चव्हाण स्वाती माने व अन्य.
प्रहार जनशक्ती पक्षाची महिला आघाडी जाहीर
RELATED ARTICLES