ठाणे(प्रतिनिधी) : ग्लोबल वॉर्मिगच्या पार्श्वभूमीवर जगभरात पर्यावरणाचे महत्व वाढीस लागले असताना पर्यावरण संवर्धनासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना
अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटीने पत्रकारिता आणि पर्यावरण विज्ञान (journalism and environment science) या विषयावर मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे
पत्रकारितेच्या माध्यमातून डॉ.प्रशांत सिनकर गेली २६ वर्षे पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली आहे. त्यांना आजपर्यंत अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अमेरिकेतील ग्लोबल ह्युमन पिस युनिव्हर्सिटीने पत्रकारिता आणि पर्यावरण विज्ञान या विषयावर डॉ. प्रशांत रेखा रविंद्र सिनकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
*
पर्यावरण संवर्धनातील कार्य :
डॉ. प्रशांत सिनकर यांनी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये पाणी आणि पर्यावरण संवर्धनविषयक पत्रकारिता केली आहे. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी जलसंधारण आणि पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या उपक्रमांना चालना मिळाली आहे.
*
त्यांच्या उल्लेखनीय कार्यांपैकी काही उदाहरणे :
तलासरी तालुक्यातील धांगडपाड (आदिवासी पाडा) येथील पाण्याच्या तीव्र टंचाईची समस्या त्यांनी आपल्या पत्रकारितेतून मांडली. त्यांच्या बातमीनंतर रोटरी क्लब आणि एल अँड टी फाउंडेशनच्या मदतीने १०० फूट खोल तलाव बांधण्यात आला.
कोकणातील साखरप्याच्या काजळी नदी किंवा महाड मधील काळ नदीतीलगाळ काढण्याची बातमी अशा नदी संवर्धनासाठी दिलेल्या वृत्ताची प्रशंसा झाली. आणि अशा वृत्तातूनच राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जलसंधारण चळवळ सुरू झाली.
“नदी की पाठशाळा” या उपक्रमांतर्गत राज्यातील १० ते १५ नद्यांच्या संवर्धनाचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
*
महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान :
डॉ. प्रशांत सिनकर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यापैकी काही प्रमुख पुरस्कार या मध्ये महाराष्ट्र शासनाचा शि.म.परांजपे पुरस्कार, नेपाळ येथील आंतराष्ट्रीय पर्यावरण परिषदेत इको-२०१३ पुरस्कार, भारतरत्न राजीव गांधी पर्यावरण भूषण पुरस्कार, ठाणे महापालिकेचा ठाणे गुणिजन, ठाणे गौरव, पश्चिम बंगाल येथील नव्या फाऊंडेशनचा राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान २०२३, हिंदुस्थान न्युज नेटवर्क यांचा “नॅशनल आयकॉन, वर्ल्ड अचिवर बुक (आंतरराष्ट्रीय), इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.