प्रतिनिधी(प्रताप भणगे) : मौजे किवळ ता.कराड येथे जागतिक महिला दिनानिमित्त माई चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत किवळ,किवळ विकास सेवा सोसायटी,महिला बचत गट, श्री संत नावजीनाथ देवस्थान कमिटी,व आम्ही किवळकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साज संगीताचा बहारदार कार्यक्रम वीरेंद्र केंजळे,सातारा प्रस्तुत राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख मा.श्री.योगेश पाटील साहेब, माजी सनदी अधिकारी मा.श्री.तानाजीराव साळुंखे (साहेब), राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या सौ.संगिता साळुंखे (माई) यांच्या प्रमुख उपस्थितीत संत श्री नवजीनाथ मंदिर परिसर,किवळ येथे संपन्न झाला.यामध्ये मराठी भावगीते,भक्तीगीते, आणि अजरामर लोकप्रिय हिंदी गीते सादर करण्यात आली.
याप्रसंगी सहसमन्वयक प्रकाशराव महाले,सुप्रसिद्ध प्रवक्ते ॲड.संभाजीराव मोहिते (नाना),माजी उपसरपंच सुनील साळुंखे (दादा),लोकनियुक्त सरपंच प्रदीप काशीद,मानसिंगराव मोहिते,उपसरपंच कैलास साळुंखे,देवस्थान कमिटीचे सचिव रामराव साळुंखे आप्पा, सचिन नळगुणे, संदीप चव्हाण सर,राजेंद्र साळुंखे,माजी उपसरपंच राहुल साळुंखे,सर्व ग्रामपंचायत सदस्य – सदस्या, सर्व बचत गटाच्या अध्यक्षा – उपाध्यक्षा, सचिव व सर्व सदस्या, ग्रामस्थ, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.