रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त काळगाव पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या माता- भगिनींचा सन्मान सोहळा प्राचार्य श्री कांबळे ए. पी. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री. भगवान गोविंद रणदिवे (महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सदस्य) हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये श्री.अजय भिवा कांबळे ( कार्यकर्ता- अंधश्रद्धा निर्मूलन समिती), श्री भिंगारदेवे सर (मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा काळगाव)श्री.पाटील सर (मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा लोहारवाडी), काळगाव च्या सरपंच सौ. राखीताई काळे व उपस्थित सर्व महिला यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.जाधव एम. एस.मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. यादव एस. एस. यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. विद्यालयाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर काळगाव पंचक्रोशी तील कर्तृत्ववान महिला सौ. राखीताई सुनील काळे (सरपंच काळगाव), श्रीम.गयाबाई राजाराम डाकवे ( स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. श्री संदीप डाकवे यांच्या मातोश्री डाकेवाडी), सौ.स्वाती अनिल देसाई (CRP काळगाव), सौ.विमल राजेंद्र मुंद्राळकर (कुमाळ), सौ.सुवर्णा महेश देसाई (कृषीसखी- काळगाव), सौ. रुपाली दत्तात्रय पवार (भरेवाडी ),
सौ.मनीषा जोशी (उपशिक्षिका जि.प. प्राथमिक शाळा काळगाव), सौ. कविता जगन्नाथ लोहार (लोहारवाडी), सौ. संगीता प्रकाश लोहार (लोहारवाडी), तसेच विद्यालयातील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यानंतर इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी कु. कुलसूम मुल्ला हिने स्त्री जीवनावर आधारित एक कविता सादर केली.
श्री. भगवान रणदिवे सर यांनी अंधश्रद्धावर आधारित वेगवेगळे प्रयोग करून दाखवले त्यामध्ये करणीमुळे नारळ पेटणे, अंगात येणे, जिभेतून सळी आर पार काढणे, बिनवातीचा पाण्याचा दिवा पेटवणे असे अनेक प्रयोग करून दाखवले. व त्यानंतर या प्रयोगां मागील शास्त्रीय कारण विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी प्रबोधन गीतही गायले. संकुलाचे प्राचार्य मा. श्री. ए.पी.कांबळे सर यांनी संयम, सहनशीलता, चिकाटी, कष्ट आणि जिद्द या जोरावर आज नारीशक्ती, सर्वत्र यशाची उत्तुंग शिखरे सर करीत असल्याचे प्रतिपादन करुन उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ग्रंथपाल श्री. थोरात सर यांनी भरवलेल्या ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी मान्यवर व काळगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी यांनी केली. इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक शाळेतील एकूण 32 विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एम. जी. साबळे सर यांनी विद्यालयाची संपूर्ण माहिती असणारी पीपीटी व व्हिडिओ क्लिप, लॉजिक इंटरॲक्टिव्ह पॅनल वर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना व पालकांना दाखवली. विद्यालयाची सुसज्ज प्रयोगशाळा व त्यामध्ये असणारे वैज्ञानिक साहित्य, वैज्ञानिक उपकरणे, गणित खेळणी, शैक्षणिक साधने, प्रतिकृती इत्यादीची माहिती श्रीम.माने एस.एम. मॅडम यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. तसेच संगणक कक्ष व आय.सी.टी. लॅब ची माहिती श्री.कांबळे टी.व्ही. यांनी दिली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना अल्पोपहार देण्यात आला. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना हा कार्यक्रम खूपच भावला. विज्ञानाची चिकित्सक दृष्टी देणाऱ्या व चमत्कारातून मनोरंजन व प्रबोधन करणाऱ्या या कार्यक्रमाचा उपस्थितांनी जिज्ञासू वृत्तीने आनंद घेतला.
विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. मुळे एम. के. मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्री.धोत्रे एस.पी. यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. ज्युनिअर कॉलेज विभागातील श्री.पाटील ए. एस. व श्रीमती भिंगारदेवे एस. आर. यांचेही सहकार्य लाभले.
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
RELATED ARTICLES