प
्रतिनिधी : विहंग प्रतिष्ठान,कामगार नगर कुर्ला यांच्या विद्यमाने कुर्ला विभागातील सोसायटीमधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या पाच महिलांची निवड करून प्रातिनिधिक स्वरूपात आज जागतिक महिला दिनी मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजक विहंग प्रतिष्ठान चे श्री.प्रसाद मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित पर्यावरण सेविका कोमल तानाजी घाग यांनी कचरा आणि मुंबईकर यांचे अनोखे नाते आणि सफाई कर्मचारी हा मुंबईचा खऱ्या अर्थाने नायक असल्याचे पटवून दिले.वरिष्ठ लेखिका श्रीमती मेघना साने यांनी महिला दिनाचे महत्व आणि महिलांचा सहभाग या विषयावर कथा कथन केले**.
या कार्यक्रमाला संपूर्ण कुर्ला नेहरू नगर,कामगार नगर आणि तत्सम विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांचा उस्फुर्त सहभाग मिळाला होता.
यांवेळी पाच महिला सफाई कर्मचाऱ्यांना **कोमल घाग* यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विहंग प्रतिष्ठान व कामगार नगर कुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन संपन्न
RELATED ARTICLES