प
्रतिनिधी : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसारख्या विभागात अठरा पगड जातीचे लोक राहत असलेल्या धारावीला ‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखलं जातं. त्या धारावी मध्ये मुंबईतील सर्वात मोठा शिवजयंती उत्सव ‘धर्म रक्षक युवा हिंदुत्व’ या संघटनेने आयोजित केला होता. ना कोणत्या नेत्याचा, ना कोणत्या पक्षाचा, एक झेंडा उस्तव शिवजयंती सोहळा… धारावीत अगदी पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्यामध्ये जागोजागी रांगोळ्या, तोफांची सलामी, ढोल ताशा, पुणेरी ढोल, लेझीम पथक, हलगी,दांडपट्टा अशा विविध वाद्यांनी मिरवणुकीला सुरुवात झाली. त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवणाऱ्या शिव मावळ्यांचे प्रमुख पाहुणे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे विभाग संघटक विठ्ठल पवार, उपविभाग प्रमुख जोसेफ कोळी, नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख आनंद भोसले, किरण काळे, मनसेचे शाखाध्यक्ष संदीप कदम,संदीप कवडे,सर्व इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी,महिला वर्ग तसेच आयोजक कौशिक कोळी आणि समीर भोईटे यांच्यासह अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही शिव मावळ्यांनी शिवगर्जना करून आणि काहींनी छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.शोभायात्रा धारावी मुख्य बाजार पेठ, संत कक्कय्या मार्ग,गणेश विद्या मंदिर,क्रॉस रोड,९० फीट रोड,साहिल हॉटेल,संत रोहिदास मार्ग,त्रिकोणी गार्डन,आणि शेवटी होळी मैदान येथे सांगता झाली.