ताज्या बातम्या

प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन तर्फे शिवजयंती उत्सव संपन्न

्रतिनिधी : १९फेब्रुवारी २०२५ रोजी प्रज्ञा प्रतिष्ठान व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन यांच्या माध्यमातून बहुजनप्रतिपालक, कुळवाडी भूषण, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खांबदेव नगर, धारावी येथील प्रज्ञा प्रतिष्ठान संस्थेच्या कार्यालय समोर अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. उपरोक्त्त कार्यक्रमास धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भीमराव धुळप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण गौतमी जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करण्यात आले. यावेळी अपर्णा कासारे यांच्या सुमुदर वाणीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने सर्व परिसर दुमदूमला. सदर कार्यक्रमास प्रणाली सेवाभावी महिला व प्रज्ञा प्रतिष्ठान चे सर्व पदाधीकारी, संजीवन जैस्वार, लक्ष्मी कावळे, सौ. जोगळे, सुनीता फळसंकर, सौ. कोळी, अलिशा कासारे, गीता जाधव, सुनील कावळे, वैभव जाधव तसेच प्रदीप धुळप,संजय धुळप आदी मान्यवर सभासद महिला वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे यांनी केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top