ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

कला शिक्षक अनिल सुतार यांनी साकारली स्व. विलासराव पाटील काका यांची अप्रतिम रांगोळी

प्रतिनिधी(प्रताप भणगे) : स्वा. दादासाहेब उंडाळकर विद्यालयाचे कला शिक्षक अनिल सुतार (सर) गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट चित्र व रांगोळी काढत आहेत. त्या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे कार्य करत असताना निसर्ग,व्यक्ती फ्रेम रांगोळी व विविध चित्रे काढून आपला नावलौकिक मिळवला आहे.

विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम केले आहे..स्वा. दादा उंडाळकर यांच्या ५१ व्या स्मृती दिनी त्यांनी स्वर्गीय विलासराव उंडाळकर काकांच्या आठवणींना रांगोळीतून उजाळा दिला आहे. रांगोळी ही काकांच्या चेहरावरील भावना आणि हावभाव किती बारकाईने अगदी जिवंत वाटावेत असे रेखाटलेत आहेत. खरंच उत्कंठावर्धक आणि प्रेरणादायी कलाविष्कार सादर करण्यात कला शिक्षक अनिल सुतार कुठेच कमी पडलेले नाहीत.त्यांच्या कलेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top