ताज्या बातम्या

स्वावलंबन ते सक्षमतेचा प्रवास… युथ फॉर जॉब फाऊंडेशनचा दिव्यांगकरिता निओ मोशन प्रकल्प

्रतिनिधी : युथ फॉर जॉब फाऊंडेशन आयोजित निओ मोशन या उपक्रमांअंतर्गत मुंबई तसेच नवी मुंबई शहरातील २५ दिव्यांग युवकांना आज बजाज तर्फे निओ मोशन इ वाहन वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला सोशल वेलफेअर कमिशनर रविराज इलवे सर तसेच समाज कल्याण विभाग कार्याध्यक्ष संगीता गायकवाड मॅडम उपस्थित होत्या.

या उपक्रमांतर्गत दिव्यांग युवकांना युथ फॉर जॉब फाऊंडेशन द्वारा प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बजाज तर्फे निओ मोशन वाहन देण्यात आले आहे. या प्रशिक्षित युवकांना झोमॅटोसारख्या नामांकित कंपनीमध्ये डिलीव्हरी पार्टनर म्हणून स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करता येणार आहे. ज्यामुळे दरमहा १५ ते २० हजार कमवून आपला तसेच कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतील.

युथ फॉर जॉब फाऊंडेशन निओ मोशन प्रकल्पाचे प्रोग्राम लीड सूर्यकांत फडके सर, प्रशिक्षक प्रियांका लब्दे व हर्षद कासले यांनी या कार्यक्रमाचे मुंबई स्टीफन हायस्कूल येथे आयोजन केले होते.

युथ फॉर जॉब फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीरा शेनोय मॅडम तसेच प्रोग्राम हेड समीर सर यांच्या निओ मोशन या प्रकल्पामुळे दिव्यांग युवकांनी स्वावलंबन ते सक्षमतेकडे पहिले पाऊल उचलले असे म्हणायला हरकत नाही.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top