ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी एस.टी. बस मधून जावळीत तीस वर्षाने केला प्रवास…

Medha

(अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील मेढा- सातारा – विजापूर या महामार्गावरील नवीन एस.टी बस चा प्रवास करून तीस वर्षाने जावळीत मंत्र्यांनी प्रवास केल्याची नोंद महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खात्यात झालेली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा व जावली विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा कॅबिनेट मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जावळी तालुक्यातील मेढा एस.टी. आगारामध्ये नवीन १० बसेस चा ताफा मिळालेला आहे. यामुळे प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
महाराष्ट्राचे वजनदार मंत्रीमहोदय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या बस मध्ये प्रवास करून आमदारांसाठी असणाऱ्या एस टी सवलतीचा लाभ घेतला. नवीन बस मध्ये प्रवास करताना वाहक श्रद्धा बर्गे यांनी मंत्री महोदयांना एस.टी. बसची सवलत तिकीट दिली. या ऐतिहासिक क्षणाच्या वेळेला सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, वाहतूक नियंत्रक ज्योती गायकवाड, तसेच जावळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते कांतीबाई देशमुख ,पांडुरंग जवळ ,संतोष वारागडे, गीता लोखंडे, दत्ता पवार यांच्यासह सायगाव, कुडाळ, मेढा, करंजे तसेच कोयना व कण्हेर धरणाच्या पुनर्वसनामुळे पंढरपूर भागामध्ये ज्यांचे पुनर्वसन झाले असे अनेक प्रवासी व सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थिती दाखवून आनंद व्यक्त केला.
साक्षात आपल्या सोबत एक कॅबिनेट मंत्री प्रवास करत असल्याचा सुखद अनुभव प्रवाशांनी घेतला. या वेळेला मंत्री महोदयां सोबत आपली बीच मी छबी चमकावी म्हणून काही ठेकेदार बस मध्ये शिरले होते. त्यामुळे एसटी अधिकाऱ्यांना बाजूला उभे राहावे लागले. अशी माहिती प्रवाशांनी दिली.

——————————————–
फोटो -जावळी तालुक्यातील मेडा आगारातून नवीन एस टी बसने प्रवास करताना मंत्री (छाया- निनाद जगताप, सायगाव )

Scroll to Top