मुंबई : इंडियनऑइल आणि छेड़ा नगर रहिवासी कल्याण संघाच्या संयुक्त विद्यमाने छेड़ा नगर मैदानावर SERVO कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व्हो कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन इंडियनऑइल, महाराष्ट्र राज्य कार्यालयाचे महाव्यवस्थापक (ल्यूब्स) श्री. ए. एस. गिते, कार्पोरेट कम्युनिकेशनचे अधिकारी अनिल नागवेकर आणि मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण उपस्थित होते.
ग्राहक संवाद उपक्रमाच्या स्वरूपात आयोजित या स्पर्धेत मुंबई मराठी पत्रकार संघासोबत, सर्व्हो मेकॅनिक्स ‘अ‘, सर्व्हो मेकॅनिक्स ‘ब‘, आणि इव्हनिंग ११ छेड़ा नगर असे चार संघ सहभागी झाले आहेत.