Monday, July 28, 2025
घरमहाराष्ट्रश्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा -मुंबई येथे दिमाखात साजरा

श्री कांडकरी महिला मंडळाचा हळदी- कुंकू समारंभ भोईवाडा -मुंबई येथे दिमाखात साजरा

मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहर पासून जवळच असलेल्या मु. पो. कासार कोळवण गावातील श्री कांडकरी विकास मंडळ, मुंबई आणि श्री कांडकरी महिला मंडळ आयोजित हळदी -कुंकू समारंभ दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भोईवाडा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला.मुंबई आणि मुंबई परिसरातील महिला मोठ्या संख्येने या सभारंभास उपस्थित होत्या.या समारंभास सौ.गार्गी रविंद्र भाटकर(अँडव्होकेट मुंबई हायकोर्ट )या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या मनोगतात हळदी-कुंकू समारंभाचे महत्व विशद करत आपली ही अमूल्य परंपरा आणि संस्कृती आपण जतन केली पाहिजे असे आवाहनही केले.तसेच मंडळाच्या सदस्यांना कायदेशीर सल्ला आणि मदत करण्यास आपण तत्पर आहोत असे प्रतिपादन केले.या समारंभात अनेक महिलांनी आपली मनोगते सुंदररित्या सादर केली.आपल्या एकत्रित महिला शक्तीद्वारे समाजाच्या भल्यासाठी आपण नेहमीच सक्रिय राहू असे अनेक महिलांनी आवर्जून सांगितले.अनेक दिवसांनी भेटल्याचा उत्साह आणि हळदी-कुंकवाचे आदानप्रदान करताना महिलांचा आनंद ओसंडून वाहत होता.
या समारंभातील मनोरंजनात्मक कार्यक्रमात सौ. शितल शशिकांत तोरस्कर आयोजित उखाण्यांचा बहारदार कार्यक्रम झाला.सदर हळदीकुंकू समारंभ यशस्वी होण्यासाठी श्री कांडकरी महिला सभासदांसोबतच श्री कांडकरी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष करंबेळे, सचिव श्री.राजाराम रावणंग, खजिनदार श्री.दिलीप तोरस्कर यांनी खूप परिश्रम घेतले.विशेषतः मंडळाचे उपसचिव श्री.राजू तोरस्कर यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी बजावली आहे. सोबत श्री.दिपक करंबेळे आणि श्री.शशिकांत तोरस्कर यांनीही मोलाची मदत केली.अतिशय आनंदात आणि प्रसन्न वातावरणात झालेला हळदीकुंकू समारंभ महिलांसाठी संस्मरणीय ठरला.या संपूर्ण कार्यक्रम साठी श्री कांडकरी विकास मंडळ, मुंबई आणि श्री कांडकरी महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि सल्लागार, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments