प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यामधून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी गेली २० वर्षे यशस्वीपणे कार्य करणाऱ्या सुहित जीवन ट्रस्ट, पेण या एकमेव संस्थेची निवड केंद्र सरकारच्या नमो दिव्यांग शक्ति अभियान* अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ३० जानेवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग पुनर्वसन केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश असलेला नमो ११ सूत्री कार्यक्रमांपैकी नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत राज्यातील दिव्यांग व्यक्तिंना आवश्यक त्या सोयी सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आली आहेत.संस्थेच्या या निवडीमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. संस्थेच्या यशस्वी, सातत्यपूर्ण कामगिरी व अविरत कार्याचा सर्वांनी सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. संस्थेच्या या यशाबद्दल संपूर्ण सुहित परिवाराचे (समस्त विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विश्वस्त) खूप खूप अभिनंदन होत आहे.
सुहित जीवन ट्रस्ट, पेण या संस्थेची केंद्र सरकारच्या नमो दिव्यांग शक्ति अभियान अंतर्गत निवड
RELATED ARTICLES