भाईंदर (प्रतिनिधी ) : समर्थ प्रतिष्ठान या भाईंदर मधील सुप्रसिद्ध सेवाभावी संस्थेतर्फे शनिवार दिनांक 25 जाने .रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ओवळा -माजिवडा विधान सभा मतदार संघ १४६ मध्ये मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला .अध्यक्ष अनिल रानावडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांना आपल्या मतांचं महत्व पटवून देत मतदार नोंदणी करणं किती गरजेचं व कसं करावं या बाबत मार्गदर्शन केले .
समर्थ प्रतिष्ठान ही संस्था गेली सात वर्षे सामाजिक ,कला ,क्रीडा ,आरोग्य ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आली आहे .
या प्रसंगी अध्यक्ष अनिल रानावडे यांच्यासह प्रतिष्ठान चे सर्व महिला ,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
समर्थ प्रतिष्ठान तर्फे मतदार जनजागृती उपक्रम
RELATED ARTICLES