प्रतिनिधी : अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था मर्यादित मुख्य कार्यालय कोपरखैरणे यांच्या वतीने घणसोली शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त ९ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याचबरोबर महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व सत्यनारायाणाची महापूजा आयोजित करण्यात आले आहे. समाजातील गरजू गरीब व्यक्तीला रक्ताची खूप आवश्यकता असते या उद्देशाने गेली अनेक वर्ष संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. या शिबिराला संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवतात. यावेळी होणाऱ्या रक्तदानातून देण्यात येणारे प्रमाणपत्र संस्थेकडे राखून ठेवले जाते आणि ज्यावेळी रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासते. त्यावेळी संस्थेकडून त्याला त्वरित ते प्रमाणपत्र दिले जाते. त्या व्यक्तीची रक्ताची गरज भागवली जाते या सामाजिक कार्याबरोबरच या वर्षीपासून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ देखील ठेवण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण पूजेला सर्वांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाचा देखील आनंद घेऊन ज्या रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी देखील या ठिकाणी येऊन रक्तदान करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुरेश शिंदे व सर्व कमिटी सदस्य यांनी केले आहे.
अजिंक्यतारा पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
RELATED ARTICLES