Sunday, August 31, 2025
घरमहाराष्ट्रबाळासाहेबांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरेंनी माफी मागून पश्चाताप करावा - शिवसेनेच्या शायना...

बाळासाहेबांच्या जयंती दिनी उद्धव ठाकरेंनी माफी मागून पश्चाताप करावा – शिवसेनेच्या शायना एनसी यांची घणाघाती टीका

मुंबई : सत्तेसाठी काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाचे विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुह्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी जाहीर माफी मागून पश्चाताप करावा, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या शायना एनसी यांनी आज केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

येत्या २३ जानेवारी २०२५ रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेनेचा वांद्रे कुर्ला संकुलनात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींकडून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांचाही यावेळी सत्कार होणार आहे, असे शायना एनसी यांनी यावेळी सांगितले.
त्यापुढे म्हणाल्या की, मुंबई महापालिकेवर यंदाही भगवा फडकवू हा निश्चय आमचा राहणार आहे. खरतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी जनतेची जाहिर माफी मागायला हवी. आम्ही मुस्लिम बांधवाचं राजकारण करत नाही. आम्ही त्यांच्याकडे वोट बँक म्हणून पाहत नाही. याउलट उबाठाला निवडणुकीत मुस्लिम समाजाची मते मिळाली. यावरुन उबाठा काँग्रेसच्या मार्गावर चालत आहे, अशी टीका शायना एनसी यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की शिवसेना विधानसभेला ८१ जागांवर लढली. निवडणुकीत जनतेने शिवसेनेला भरभरुन मतदान केले. अपक्षांसह शिवसेनेचे एकूण ६० आमदार निवडून आले. मेहनत, परिश्रम आणि जनसेवेच्या आधारावर शिवसेना पक्ष चालतो असे त्या म्हणाल्या. बांग्लादेशीं विरोधात शिवसेनेने वेळोवेळी कठोर भूमिका मांडलेली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची बांग्लादेशींबाबत जी भूमिकाही तीच भूमिका आजही शिवसेनेची आहे. त्यानुसार राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल, असे विश्वास शायना एनसी यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments