तळमावले/वार्ताहर : २३ जानेवारी हा हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा दिवस. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत बाळासाहेब ठाकरे यांची पेपर कटींग आर्ट मधून कलाकृती साकारत त्यांना विनम्र अभिवादन केले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी. डाॅ.डाकवे हे गेले काही वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकारत त्यांना अभिवादन करतात.
विविध माध्यमातून कलाकृती रेखाटण्यात माहीर असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी पिवळया रंगाच्या कार्डशीट पेपर
वर नको असणारा भाग कापून बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहुब कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती रेखाटत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या चित्रांची नोंद ‘‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’’, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतली आहे.