Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्रसाठ वर्षांवरील क्रिकेटपटूंची बोर्डी येथे स्पर्धा उत्साहात ; सव्वाशे खेळाडूंनी घेतला भाग

साठ वर्षांवरील क्रिकेटपटूंची बोर्डी येथे स्पर्धा उत्साहात ; सव्वाशे खेळाडूंनी घेतला भाग

बोर्डी(प्रतिनिधी) : हल्ली तरुण पिढी मोबाईल खेळात व्यस्त असताना ६० वर्षावरील तरुणांसाठी मल्ल्या वराडकर फ्रेंड्स ज्येष्ठ नागरिक क्रिकेट क्लब आणि सु पे ह हायस्कूल माजी विद्यार्थी संघ बोर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डी येथील निसर्गरम्य ठिकाणी ६० वर्ष वयावरील खेळाडूंसाठी दोन दिवस मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

जवळपास सव्वाशे खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन आपले योगदान दिले आणि स्पर्धा गाजविली. मल्ल्या वराडकर फ्रेंड्स चषक स्पर्धेत खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनी वयाची ऐंशी गाठली होती. वयाची साठी ओलांडलेल्या खेळाडूंसाठी घेतली गेलेली ही एकमेव मर्यादित षटकांची एकमेव टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाईल.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेसाठी मुंबई आणि गुजरात येथून आलेल्या खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था बोर्डी येथील विश्रामधाम मध्ये करण्यात आली. विश्रामधाम येथील सुसज्ज निवासस्थान हे पाहुण्या खेळाडूंनी भरून गेले होते, तसेच बाजूलाच लागून असलेले आचार्य भिसे विद्यानगर कै मदनराव पा. सावे क्रीडा संकुल, बोर्डी येथील भव्य मैदानात ही स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

मुंबई आणि गुजरात येथील सात नामांकित ज्येष्ठ नागरिक क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मल्ल्या संघ, वराडकर संघ, मुंबई वॉरियर्स (अनिल भालेराव) संघ, राजकोट संघ, सुरेंद्र नगर संघ,अहमदाबाद संघ , बरोडा संघ असे सात नामंकित संघ या स्पर्धेत उतरले होते.

अंतिम सामना माजी कमांडंट श्री अनिल भालेराव यांचा मुंबई वॉरियर्स संघ आणि कर्णधार रोहित बुंदेला यांचा राजकोट संघ यांच्यात झाला. अटीतटीने खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई वॉरियर्स या संघाने बाजी मारली त्यांनी राजकोट संघाचा चार गडी राखून पराजय केला.

श्री अस्लम यांना अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

स्पर्धेतील बेस्ट बॉलर..श्री मॅक्सी डिमेलो, बेस्ट फील्डर..श्री विली परेरा, बेस्ट बॅटर..श्री अहमद दोडिया आणि मॅन ऑफ द सिरीज..श्री उमेश मांजरेकर यांची निवड करण्यात आली, त्यांना चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

त्यानंतर झालेल्या दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर श्री एन के पाटील सर..बोर्डी गावचे सर्वेसर्वा, अविनाश सावे अध्यक्ष आणि श्री राजन चुरी,कार्यवाह, श्री प्रभाकर राऊत (नाना) उपाध्यक्ष ( सु पे ह हायस्कूल माजी विद्यार्थी संघ,बोर्डी) श्री शाम दुबळा, सरपंच बोर्डी, श्री शेखर वराडकर मल्ल्या वराडकर संघाचे श्री रवी मल्ल्या,शिरिष वराडकर,रमाकांत राणे,श्री नरेश नेत्रावळकर सदाशिव मराठे, अविनाश तावडे, नामदेव दिघे , संदीप जोशी, भूषण मूळे आदी पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी मल्ल्या वराडकर संघाचे श्री रवी मल्ल्या, शिरिष वराडकर, रमाकांत राणे संदीप जोशी, आणि इतर पदाधिकारी तसेच सु पे ह हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री अविनाश सावे..कार्यवाह श्री राजन चुरी..,श्री प्रभाकर राऊत (नाना) उपाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी अविश्रांत मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments