ठाणे (प्रतिनिधी) : सर्व सुखी सर्व भूती … म्हणजेच देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात जे मागितलं तेच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्येत मांडले आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्या पद्धतीने जगाच्या कल्याणाचा आणि आनंदाचा विचार करतात. अगदी त्याच पद्धतीने जीवनविद्या समाज सुखी करण्याचा विचार करते, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.
जीवनविद्या मिशनने ज्ञानेश्वर माऊली यांचा यंदाचा ५६ वा पुण्यस्मरण सोहळा साजरा केला. यावेळी सद्गुरुंचे सुपुत्र आणि जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी आपल्या प्रबोधनात मांडले. जीवनविद्या मिशनतर्फे दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा हा सोहळा ठाणे येथील जे के ग्राम ग्राऊंड, पोखरण रोड १, कॅडबरी कंपनीच्या समोर संपन्न झाला.
प्रत्येक टप्प्यात माणसाला पडणारे प्रश्न हे वेगळे आहेत. पण या प्रश्नांना उत्तर जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानातून मिळणार आहे. जीवनविद्या फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही समाज प्रबोधनाचं कार्य करीत आहे. यावेळी प्रत्येक लोकांचे प्रश्न सारखेच असतात. प्रत्येकाला सुखी व्हायचे असते पण ते सहज सोपे आहे का? किंवा मला या सगळ्याची काय गरज? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जीवनविद्या सांगते, प्रत्येकाला सुखी करण्याचे सामर्थ्य या जीवनविद्येत आहे.
या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काढण्यात आली. या पालखीत माऊलींचं स्मरण करत ‘संतांची दिंडी’ काढण्यात आली. यावेळी ठाणे ज्ञानसाधना केंद्रांचे नामधारक सहभागी झाले होते. यावेळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. या दिंडी वारीतच प्रल्हाद पै यांचं स्वागत करण्यात आलं.
तसेच यासोबतच नामसंकिर्तनातून सगळ्या संतांना स्मरण करत त्यांचा जागर करण्यात आलं. या सर्व सुखी सर्व भूती … म्हणजेच देवा सर्वांचं भलं कर, कल्याण कर. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात जे मागितलं तेच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी जीवनविद्येत मांडले आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्या पद्धतीने जगाच्या कल्याणाचा आणि आनंदाचा विचार करतात. अगदी त्याच पद्धतीने जीवनविद्या समाज सुखी करण्याचा विचार करते, असे प्रल्हाद पै यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक टप्प्यात माणसाला पडणारे प्रश्न हे वेगळे आहेत. पण या प्रश्नांना उत्तर जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानातून मिळणार आहे. जीवनविद्या फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही समाज प्रबोधनाचं कार्य करीत आहे. यावेळी प्रत्येक लोकांचे प्रश्न सारखेच असतात. प्रत्येकाला सुखी व्हायचं असतं पण ते सहज सोपं आहे का? किंवा मला या सगळ्याची काय गरज? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जीवनविद्या सांगते, प्रत्येकाला सुखी करण्याचे सामर्थ्य या जीवनविद्येत आहे.