नवी मुंबई प्रतिनिधी :- ह.भ.प. दतात्रय महाराज कळंबे यांनी गोरगरीब व कष्टकरी कामगार ,शेतकरी व सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन मुंबई गोल देऊळ येथे स्थापन करण्यात आलेल्या बँकेच्या कोपर खैरणे शाखेचा १० वा वर्धापन दिन शुक्रवार १७ जानेवारी रोजी संपन्न झाला.
सदर प्रसंगी बँकेचे विद्यमान संचालक श्री योगेशजी गोळे , संतोष कळंबे, बाळासाहेब भालेघरे , गणेश भोसले , चंद्रकांत गवळी , मॅनेजर विलास वाडकर यांच्यासह बँकेचे सभासद श्री रमेश संकपाळ सर व कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते.
वै.ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर
उपस्थित संचालकांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून त्यांच्या समस्या ऐकून घेऊन त्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये मांडण्याचे आश्वासन दिले. कोपरखैरणे शाखेच्या कारभारविषयी संचालकांनी समाधान व्यक्त केले व याहीपेक्षा अधिक जोमाने शाखेची आगामी आर्थिक वर्षात वाढ करण्याकरिता सूचना व शुभेच्छा दिल्या.
अधिकारी श्री विजय शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले .
डीएमके जावळी सहकारी बँकेच्या कोपरखैरणे शाखेचा १०वा वर्धापन दिन संपन्न
RELATED ARTICLES