प्रतिनिधी – नुकतीच लोकसभा निवडणूक २०२४ जाहीर झाली आणि सर्वच पक्षात उमेदवारी वरून चढाओढ बघायला मिळत असताना महाविकास आघाडीने आपले डाव टाकण्यास सुरुवात केली मात्र महायुतीचे उमेदवार अजून घोषित होत नाहीत,तोपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात अगोदर आपले उमेदवार जाहीर करून राज्यात नंबर वन आपणच आहोत हे सिद्ध केले आहे.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने पक्षाचे सचिव,शांत,संयमी कुशल नेतृत्व व स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्ष अनिल देसाई यांची उमेदवारी घोषित केली.एक सच्चा निष्ठावंत शिवसैनिक तिकीट लढवत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा चैतन्य निर्माण झाले आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सोमवारी (१५ एप्रिल) ला धारावीत बघायला मिळाले. धारावीतील शास्त्रीनगर,गोपीनाथ कॉलोनी,शिवनेरी बिल्डिंग, लहू वस्ताद चाळ येथे अनेक ठिकाणी लोकसभा उमेदवार अनिल (भाऊ) देसाई यांचे जंगी स्वागत करताना सोसायटी मेम्बर,मंडळे,चाळ कमिटी यांनी देसाई यांचे जंगी स्वागत करून गद्दारांना गाढणार आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांला लोकसभेत पाठवणार असेच सर्वजण बोलताना दिसत होते,फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मोठमोठे पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला मशाल पेटवून लोकसभेत पाठवण्याचा यावेळी अनिल भाऊ देसाई हे सुद्धा भावुक झालेले बघायला मिळाले.
यावेळी नगरसेवक वसंत नकाशे,विभाग संघटक विठ्ठल पवार,माजी आमदार बाबुराव माने,महादेव शिंदे,शाखाप्रमुख किरण काळे,सतीश कटके,आनंद भोसले,बाबासाहेब सोनवणे, महिला विभाग संघटक कविता जाधव, महिला विधानसभा समनव्यक माया जाधव,शाखासघटक माधुरी गायकवाड,कविता भागणे यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.