मुंबई (शांताराम गुडेकर ) श्रीराम मंदिर धामणदेवी, ता.पोलादपूर जि.रायगड तर्फे वै. परमपूज्य सद्गुरु मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्रीपतीबाबा मोरे यांच्या प्रेरणेने श्री सद्गुरु दादा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ ते गुरुवार १८ एप्रिल २०२४ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी ७ वाजता हभप तुकाराम सीताराम शिगवण यांच्या हस्ते श्रीचां अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 वाजता हभप दगडु शिगवण यांच्या हस्ते विणापुजन तर दगडु चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. सकाळी १० ते १२ वाजता हभप निवृत्ती दादा मोरे यांचे कीर्तन , संध्याकाळी ४ ते ५ वाजता विठ्ठल भरणे यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ वाजता हभप शिवम महाराज कदम यांचे कीर्तन , मंगलवार १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ वाजता हभप सत्यवान महाराज महाडिक यांचे कीर्तन , संध्याकाळी ४ ते ५ हभप प्रवीण वांद्रे यांचे प्रचवन तर रात्री हभप तुळशीदास महाराज मोकळ यांचे कीर्तन , बुधवारी १७ एप्रिल २०२४ रोजी हभप लक्ष्मण महाराज जाधव यांचे कीर्तन व संध्याकाळी प्रवचन तर रात्री ९ ते ११ वाजता हभप गौतम महाराज जाधव यांचे कीर्तन गुरुवार १८ एप्रिल २०२४ रोजी हभप रघुनाथ महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती पुणा व मुंबई च्या कमिटीच्या वतीने तसेच प्रसिद्ध उद्योगपती अनंत गणपत कदम , अर्जुन बांद्रे , बाळाराम कदम , बळीराम चव्हाण , पांडुरंग मोरे , अनिल गोडांबे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
श्री राम मंदिर धामणदेवी तर्फे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन
RELATED ARTICLES