प्रतिनिधी : प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी दि.१४ एप्रिल २०२४ रोजी मुंबई दादर चैत्यभूमी या ठिकाणी शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली,
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय रमेश बैस यांच्या मुख्य उपस्थित सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून शासकीय ईतममात मानवंदना देण्यात आली,तदनंतर सर्वं भतेंजीच्या सहाय्याने बुद्धवंदना घेण्यात आली त्याच दरम्यान हेलीकाप्टर च्या सहायाने चैत्यभूमी परिसरात शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.
तदनंतर विचार मंचावर मा.राज्पाल तसेच महानगरपालिका पालिका आयुक्त मा. भुषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, उपायुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षिरसागर,तसेच जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी इत्यादी मान्यवर स्थानापन्न होताच सामुदायिक राष्ट्र गीत गायले गेले त्याला साथ दिली मनपा शाळेतील शिक्षक संगीत कलाकारांनी.
याच कलाकरांनी जय जय महाराष्ट्र माझा … हे गित सादर केले तदनंतर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवपर गित गाऊन बाबासाहेबांना संगित मानवंदना दिली.
या जयंती प्रसंगी चैत्यभूमी समन्वय समीतीचे आयु.नागसेन कांबळे तर रिपब्लिकन सेनेचे आयु. रमेश जाधव उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी जयंतीनिमित्त अनुयायी यांची वाढणारी गर्दी पाहता मुंबई महापालिका पालिका यांनी स्वच्छतेबाबत चोख बंदोबस्त केला होता,
रविवार हा सुट्टीचा दिवस असून सुद्धा कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावून अनुयायी यांना सेवा दिली.ही सेवा तिन्ही पाळीत दिली जाणार आहे.
मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून जी/उत्तर विभागा व्यतिरिक्त एफ/दक्षिण विभागाकडून कामगार घेण्यात आले.
या कामामध्ये रस्ते झाडलोट करणे,रस्ते धूऊन घेणे ,माती, डेब्रिज उचलणे इत्यादी वर भर देण्यात आला होता.
मुंबई मनपा सेवांबरोबर पोलीसांनी सुध्दा चोख बंदोबस्त केला आहे.
जयंतीचे औचित्य साधून मा. राज्यपाल यांच्या हस्ते भंतेजी राहूल बोधी तसेच ईतर भंतेजीना चिवर प्रदान करण्यात आले.
दादर चैत्यभूमी भुमी या ठिकाणी महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न!
RELATED ARTICLES
उत्कृष्ट प्रशासकीय काम आणि टिमवर्क