प्रतिनिधी : महामानव भारतरत्नं डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त देशभरातून बाबासाहेबांचे अनुयायी दादर चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी येतात… या भीम जनसागराला दादर चैत्यभूमी येथे येण्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राहुल शेवाळे यांनी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी कोणताही मेगा ब्लॅाक न घेण्याचे विनंती पत्र पाठवले आहे. रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॅाक नियोजीत केला आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या अनुयायींना येण्यास गैरसोय होणार आहे. ती होऊ नये यासाठी राहुल शेवाळे यांनी रेल्वे प्रशासनाला विनंती पत्र पाठवले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेल्वेने घेतलेला मेगा ब्लॉक मागे घेण्यासाठी शिवसेना खासदारांचे रेल्वे प्रशासनाला पत्र
RELATED ARTICLES