प्रतिनिधी : गिरगाव खेतवाडी रोड नंबर ३ येथील एका चर्मकार महिलेच्या ७० वर्षे जुने असलेल्या दुकाना विकासक कुमार गांधी (धुलेवा ग्रुप) यांनी दुकानाची तोडफोड करून मराठी माणसावर तेही एका मागासवर्गीय महिलेवर अन्याय केला आहे. सदर जागा बांधकामासाठी घेतले असली तरी संबंधित जागेमध्ये गेले ७० वर्षे व्यवसाय करणाऱ्या चर्मकार समाजातील महीलेवरती अन्याय केला आहे. सदर महिला राजेश्री राजेंद्र पालशेतकर यांनी सागितले. माझे दुकान रस्त्याकडे तोंड करून आहे तर मला तसेच द्यावे मात्र बिल्डर यांनी त्यांना आतील बाजूस दुकान देण्याचे कबूल केले आहे. आणि बाहेरील बाजूस मारवाडी, गुजराती यांना व्यवसाय करण्यास दुकाने दिली आहेत. करारनामा करून द्या बोलले तर ते सुद्धा देत नाहीत. माझे दुकान होते त्याच ठिकाणी रस्त्याकडे तोंड करून द्यावे. त्यामुळे ज्या गिरगावात मराठी माणसाने त्यांना मिळेल असा व्यवसाय करत तेथे वास्तव्य केले. त्याच गिरणगावात आज मराठी माणसा वरती अन्याय होत आहे. त्याला न्याय कोण देणार संबंधित प्रकरणी तेथील स्थानिक आमदार खासदार यांनी सदर चर्मकार समाजातील महिलेला न्याय द्यावा आणि सबंधित विकासाकावर कारवाई करावी. अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांच्या वतीने तसेच चर्मकार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
