Monday, October 27, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भनागपुरात मुख्यमंत्र्यांच्या मागणीने ठेकेदार परतीच्या मार्गावर….

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या मागणीने ठेकेदार परतीच्या मार्गावर….


नागपूर(अजित जगताप ) : बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारचा सत्तेतील सहभाग वाढला आहे. परंतु लोकांसोबत काही ठेकेदारांची गर्दी वाढल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अध्यक्षांकडे महत्वपूर्ण मागणी केली आहे.
त्यामुळे राज्यातून आलेल्या ठेकेदार परतीच्या मार्गावर असल्याची खात्रीलायक वृत्त हाती आली आहे. याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये २८८ आमदारांपैकी महायुतीने २३६ व महाविकास आघाडीने ४९ जागी विजय संपादन केलेले आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे ५७ ,अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ४१ आहे. व राष्ट्रीय काँग्रेस कडे १६ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १० , उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेकडे २० आणि समाजवादी जन स्वराज्य पार्टी व इतर आमदार निवडून आलेले आहेत. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची शपथविधी झाली अजूनही खातेवाटप झालेले नाही. परंतु, नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात काही ठेकेदार व लोकांची गर्दी दिसून आली.
समाज माध्यमावर नागपूरच्या मंत्रिमंडळ शपथविधीच्या जागी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची छबी पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहांमध्ये एक मागणी करताना स्पष्ट केले की माझी मागणी लोकप्रियतेसाठी नाही. काही वर्षांमध्ये कायदे मंडळातील लॉबीमध्ये चालता येणे किंवा उभे राहणे. अडचणीचे ठरत आहे. मी २५ वर्षे अजितदादा ३० वर्षे व इतर ३५ वर्षे या सभागृहात कामकाज पाहत आहेत .परंतु, आता एक आमदार २५ माणसे घेऊन येत आहेत.
खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळात अभ्यासू चर्चा व्हावी. मंत्र्यांनी गुणात्मक व चांगले उत्तर दिले पाहिजे. ही अपेक्षा आहे.
ही विधिमंडळाची प्रथा आहे. परंतु, सध्या बाजारासारखे वातावरण असू नये. शब्द चुकीचा असला तरी माफी मागतो. असं मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले. खरं म्हणजे शपथविधीला अनेक कार्यकर्ते व हितचिंतक जातात.
सध्या ठेकेदारांची गर्दी पाहून अखेर मुख्यमंत्र्यांना वस्तू स्थिती मांडावी लागलेली आहे. त्याचे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,सांगली, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे स्वागत केले जात आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चार कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्रिमंडळात शपथविधी घेतली ही आनंदाची बाब आहे. परंतु गेले अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी व्यावसायिक ठेकेदारांनीच नागपूर विधिमंडळ परिसरात गर्दी केली होती. आता गड्या, कामे मिळवा. कमिशन देऊन पैसा कमवा. असाच काहींचा सूर असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. याबाबतही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन काही सामाजिक कार्यकर्ते या प्रश्नावर प्रकाश टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments