सातारा(अजित जगताप ) : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निवड झाली. यामुळे सातारा शहरात मुस्लिम बांधवांनी जल्लोष केला. राजकारण्याच्या सन्मान राखण्याबद्दल साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते अझर मणेर मित्र समूहाच्या वतीने पेढे वाटप करण्यात आले.
नूतन मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा भव्य दिव्य सत्कार सातारा शहरात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विक्रमी मताने निवडून देण्याची भूमिका घेऊन साताऱ्यातील मुस्लिम बांधव व सामाजिक कार्यकर्ते अझर मणेर यांनी एका राजकीय पक्षाचा राजीनामा दिला व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यपद्धती वर विश्वास ठेवून प्रचारामध्ये आघाडी घेतली. या प्रचार यंत्रणेमध्ये त्यांनी मुस्लिम मोहल्ला व वाड्या वस्तीमध्ये भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भूमिका सर्व दूर पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या भूमिकेचे राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती खा .उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.
सातारा शहराला मंत्रीपद देऊन खऱ्या अर्थाने सामान्य लोकांसाठी झटणाऱ्या नेतृत्वाला संधी दिलेली आहे. या संधीचे ते निश्चितच सोने करतील व सातारा शहर व परिसरातील विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करतील. अशा व्यक्त केली आहे. यावेळी सातारा शहरातील गुरुवार परज, शनिवार पेठ, रविवार पेठ, बुधवार नाका, राजवाडा परिसरात कंदी पेढ्याचे वाटप केले. हा आनंदाचा क्षण असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर साताऱ्यात नूतन मंत्री महोदय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत व सत्कार करण्यात येईल. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होतील .असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक शकील बागवान,, मुक्त्यार पालकर, समीर नायकवडी, समीर खान, फारुख कच्छी, सलीम शेख,अबीद बागवान, हाजी मलंग नदाफ, अफजल शेख ताज, युनूस भाई शेख, अफजल पठाण, आधी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

——————–&&&—————
फोटो -आमदार भोसले यांना मंत्री केल्याबद्दल पेढे वाटप करताना (छाया- अजित जगताप, सातारा)