सातारा(महेश कवडे) : १४ डिसेंबर फत्यापूर ता. सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी सार्थक सचिन मोरे याने आज आपल्या गावच्या व आपल्या शाळेच्या शिरोपेचात एक मानाचा तुरा रोवला.
सार्थक ची घरची परिस्थिती तशी हलाखीची पण शिक्षणाची आवड व जिद्द त्याच्यात भरपूर आहे. शिक्षणासोबतच त्याला खेळात सुध्दा भरपूर रस आहे आणि हीच त्याची जिद्द त्याला शांत बसू देत नाही. आज सातारा येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत त्याने २०० मीटर धाव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला. खर म्हणजे त्याला आपल्या घरच्या परिस्थितीची जाण आहे त्यामुळे त्याने कुणाला नवीन बुटाच्या जोडीसाठी हट्ट धरला नाही तर तो अनवाणी धाव पट्टीवर धावला आणि फक्त धावला नाही तर त्याने तालुक्यात प्रथम क्रमांक काढला आहे व त्याची पुढील फेरीसाठी निवड झाली आहे. आज त्याच्या या कर्तुत्वाने गावच्या व शाळेतील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुळात जर मनात जिद्द असेल तर व्यक्ती कोणत्याही यशाला गवसणी घालू शकतो याचे उत्तम उदाहरण सार्थकने सर्वांसमोर ठवले आहे. त्याचे याच स्पर्धेतील यश पाहून सरकार कॅम्पस महाराष्ट्र राज्य चे संस्थापक चंदन भाऊ शिंदे (सरकार) व शुभम घाडगे व सदस्यांनी यांनी त्याचे अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि त्याला पुढील काळात काही मदत लागल्यास सरकार कॅम्पस महाराष्ट्र राज्य हे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल असे ही त्यांनी आश्वासन दिले. राहते घर आणि परिस्थिती पाहता या व्यक्तीमध्ये जिद्द भरपूर आहे परंतु तसं पाठबळ मिळत नाही ह्या व्यक्तीला जर पाठबळ मिळालं तर येणाऱ्या कुठल्याही स्पर्धेमध्ये हा व्यक्ती भाग घेऊन देशाचे नेतृत्व करेल असं गावकऱ्यांना वाटतं त्यामुळे आमच्या बातमीशी संपर्क साधला आणि आम्हाला बातमी करण्यासाठी प्रोत्साहन दिल, खरं तर खेडेगावामध्येच असे क्रीडापटू तयार होतात आपल्याला पाहायला मिळतात जे परिस्थिती वरती मात करत रानात, उन्हात, हिवाळ्यात,पावसाळ्यात फिरत असतात आपल्या भाकरीच्या शोधामध्ये कधी जळणाच्या शोधामध्ये आणि त्यांच्या पायाचे बळ एवढं वाढलेलं असतं की ते कुठल्याही प्रकारची तमा बाळगत नाहीत मग ते पाय अनवाणी असू द्यात किंवा पायामध्ये चप्पल असू द्यात पण डोक्यामध्ये जिद्द असते काहीतरी करण्याची आणि करून दाखवण्याची हेच जिवंत उदाहरण आहे. सातारा,सांगली, कराड, कोल्हापूर, हा भाग तर संपूर्ण सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचाच आहे आणि जवानांच्या पोटी जवानच जन्माला येतात.
आपल्या अवतीभवती सोबत आले ज्या गोष्टी घडतात त्या पाहिल्या जातात आणि त्याचं अनुकरण केलं जातं आणि आपल्यामध्ये पण तशी एक काहीतरी ताकद निर्माण करावी ह्या जिद्दीने लहानपणापासूनच गावातली मुलं पेटून उठतात आणि त्यातनं फौजी /जवान तयार होतात. गरज आहे ती योग्य प्रशिक्षण आणि उत्तम खाद्य हे भारताचे भविष्य आहे,यांना मार्गदर्शन लाभले पाहिजे.