प्रतिनिधी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेबbआंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता दादर, चैत्यभुमी आणी शिवाजी पार्क परिसरात या वर्षी ७ लाख अनुयायी संपूर्ण भारत देशातून ३ डिसेंबरपासून आले होते. या सर्व अनुयायांना राहण्यासाठी निवारा,पिण्याचे पाणी, आंघोळीची सोय,शौचालये इत्यादी सोयी विनामूल्य मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सालाबादप्रमाणे दिल्या होत्या.
त्यामधे स्वछता ही उच्च प्रतीची सेवा देऊन कचऱ्यापासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुयायांचे उत्तम आरोग्य महानगर पालिका घनकचरा व्यवस्थापन खाते सांभाळत होते, तर अनुयायांच्या प्रार्थमिक उपचारासाठी आरोग्य खाते सज्ज होते.
पोलिस दल, विभाग यांनी चोख जबाबदारी सांभाळल्या मुळे कायदा सुव्यवस्था अबाधित होती बेस्ट अधिकारी यांनी उत्तम प्रकाश,पंखे, एलिडी इत्यादी सेवा दिल्या होत्या,
मुंबईमध्ये अनुयायांच्या प्रचंड संख्येने उपस्थीतीत होणार्या या मोठया सोहळयाचे प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन व आयोजन केले जाते.
अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैर सोय झाली नाही, शांततेचे वातावरण, कायदा सुव्यवस्था अबाधित असणार्या अभय वातावरण आणी महानगर पालिका व
प्रशासनाने पुरवलेल्या सुविधांचा फायदा घेत अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब याना अभिवादन केले.
डोळ्यांचे पारणे फिटनारा हा सोहळा!
महानगरपालिका, महाराष्ट्र शासन या साठी कौतुकास पात्र ठरले आहेत, त्यांचे कौतुक करणे साठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे करिता सूर्य पुत्र यशवंत भिमराव आंबेडकर यांच्या ११२ व्या जयंतीचे औचित साधून भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल यांच्या वतीने कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचा कृतज्ञ सोहळा आंबेडकरी कुटुंबीयांच्या वतीने दादर चैत्य भूमीवर संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू
भिमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर,व पणतू अमन आंबेडकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावरील पुस्तक व शाल देऊन कामगार कर्मचारी,अधिकारी यांचा यथोचित सन्मान केला.
कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना भोजनदान देऊन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैत्यभूमीचे व्यवस्थापक
प्रदीप कांबळे यांनी केले.
आंबेडकरी कुटुंबीयांच्या वतीने चैत्यभूमीवर कृतज्ञ सोहळा संपन्न!
RELATED ARTICLES