Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भबीड मधील केज तालुक्यांतील सरपंचाची हत्या;कुटुंबाकडून न्यायाची मागणी

बीड मधील केज तालुक्यांतील सरपंचाची हत्या;कुटुंबाकडून न्यायाची मागणी

प्रतिनीधी : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) अपहरण करून हत्या करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसेच गावकऱ्यांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, “माझ्या पोटचा गोळा गेला आहे, आम्हाला सरकारने न्याय द्यावा”, अशा शब्दांत मयत संतोष देशमुख यांच्या आईने टाहो फोडला. तसेच “माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी”, अशी मागणी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी देशमुख कुटुंबाने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments