प्रतिनीधी : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे राज्यस्तर विशेष कक्ष प्रमुख श्री.lरामेश्वर भाऊ नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व्यक्तिमत्व आहेत. मागील दोन वर्षापासून मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोग्यदूत म्हणून काम पाहत होते. या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधी च्या कक्ष प्रमुख पदी श्री मंगेश चिवटे हे गेली अडीच वर्ष कामकाज पाहत होते. मात्र राज्यात पुन्हा बहुमताने महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील श्री रामेश्वर नाईक यांची राज्याच्या आरोग्य कक्ष प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती
RELATED ARTICLES