Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसमर्थ गावात कचरा व्यवस्थापन यशस्वीसाठी मातीच्या कुंडी व कल्चर वितरण….

समर्थ गावात कचरा व्यवस्थापन यशस्वीसाठी मातीच्या कुंडी व कल्चर वितरण….


सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील आदर्श गाव असणाऱ्या समर्थ गाव ग्रामपंचायत मध्ये कचरा व्यवस्थापन करण्यासाठी गावामध्ये कचराकुंडी व कल्चर मोफत वितरण करण्यात आलेले आहे .यामुळे कचऱ्यापासून खत निर्मिती व आरोग्यदायी गाव अशी संकल्पना राबवण्यात आलेले आहे.
या विधायक उपक्रमासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व सातारचे गट विकास अधिकारी सतीश बुध्दे, विस्तार अधिकारी सोनल झोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ग्रामपंचायत अधिकारी सौ .जयश्री साळुंखे या घरोघरी जाऊन प्रबोधन करत आहेत.
समर्थ गाव सरपंच हिराबाई धारेराव, उपसरपंच रघुनाथ कदम, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियान५.० अंतर्गत शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी होत असल्याने खऱ्या अर्थाने समर्थ गाव समृद्ध होऊ लागलेले आहे.
समर्थ गाव हे समर्थ करण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सध्या कचरा ही नैसर्गिक आपत्ती इतकीच आपत्ती म्हणून पाहण्यास मिळत आहे .अनेक रोगराई पसरवण्यासाठी कचरा कारणीभूत ठरत आहे जर कचरा नष्ट केला किंवा त्याच्यावर प्रक्रिया केली तर खऱ्या अर्थाने लोकांचे आरोग्य चांगले राहील. यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान ५.० यशस्वी पणाने प्रयत्न होत आहेत. आणि या कार्यासाठी निवड झाल्याबद्दल सर्वच ग्रामस्थ प्रशासनाचेच आभार मानत आहे.
माझी वसुंधरा अभियान म्हणजे निसर्गाची पूजा आहे असे सर्व ग्रामस्थ समजत आहेत. मातीच्या कुंड्या व कल्चर याचे वाटप होत असल्याने लोकांनाही घरातील ओला व सुका कचरा कचरा गोळा करून तो मातीच्या कुंडीत कुजवल्यानंतर त्याचे खत निर्मिती होते. या खताचा उपयोग परसबाग व शेतीसाठी होत असल्याने भाजीपाला उत्पन्नातही वाढ होऊ लागलेले आहेत. अशी माहिती समर्थ गाव ग्रामपंचायत अधिकारी सौ .जयश्री साळुंखे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.


फोटो -समर्थ गाव या ठिकाणी मातीच्या कुंडी व कल्चर वितरण करताना ग्राम पंचायत अधिकारी सौ साळुंखे व सरपंच हिराबाई धारेराव (छाया- निनाद जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments