उंडाळे ता. : संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये. साळशिरंबे, ता. कराड या गावचे सुपुत्र संपत पांडुरंग शेंडगे यांना सामाजिक कार्यात उल्लेखणीय काम करत असल्याबद्दल, ईगल फाउंडेशन तर्फे “गरुड झेप” ” राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार-2024″ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा.निवेदिता माने,
सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त श्री सुर्यकांत तोडकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ईगल फोंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले.
फोटो ओळी
अतिग्रे… राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार माजी खासदार निवेदिता माने, प्रवीण काकडे यांच्या हस्ते स्वीकारताना संपत शेंडगे
