कराड( प्रतिनिधी) वारकरी साहित्य परिषदेने राबवलेले उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी केले ,शेवाळेवाडी ता कराड येथील भैरवनाथ विद्यालयात वारकरी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते ,यावेळी निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील ,सातारा जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव ,कराड दक्षिणचे अध्यक्ष शंकर महिंदकर उपाध्यक्ष भगवान महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी बोलताना जगताप म्हणाले कि, वारकरी सांप्रदायाचा वारसा माझ्या घरात देखील लाभला आहे ,माझे आई आणि वडील हे दोघेही वारकरी सांप्रदायाचे होते, त्यामुळे वारकरी सांप्रदायावर माझे विशेष प्रेम आहे आणि आदर आहे,संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ वारकरी साहित्य परिषदेने राबवलेले सर्व उपक्रम आदर्शवत असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले ,या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला , या कार्यक्रम प्रारंभी भव्य अशी दिंडी काढण्यात आली ,या कार्यक्रमासाठी विरवाडी ,पाटील वाडी, शेवाळवाडी ,महासोली ,शेळकेवाडी हनमंतवाडी,वारकरी सांप्रदायातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ:अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या संघटक पदी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांची निवड झाल्याबद्दल वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला, याप्रसंगी निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
