Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशमी ही एक मुलगी आहे,कोणाची बहीण,बायको आहे, अभिनेत्री असल्यामुळे काम हे करावंच...

मी ही एक मुलगी आहे,कोणाची बहीण,बायको आहे, अभिनेत्री असल्यामुळे काम हे करावंच लागते; अमृता खानविलकर कोणावर चिडली….

प्रतिनिधी : अमृता फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही उल्लेखनिय काम करते. अमृतानं आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवीन वर्षाच्या निमित्तानं पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला सल्ला दिला आहे. 
अमृतानं तिच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं आहे. अमृता म्हणाले की “आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल…. नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार…. नवीन मनोकामना …. नवी स्वप्ने … देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ….”
अमृता पुढे म्हणाली की “जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मी ही हेच केलं…. कारण मी ही फक्त नावानं नाही तर धर्मानं मराठी आहे …. संस्कारानं मराठी आहे …. मूळची कोकणातील …. पण जन्म मुंबईचा आहे…. मी ही कोणाची तरी मुलगी आहे… बहीण आहे …. मावशी आहे…. ताई आहे…. मैत्रीण आहे…. बायको आहे…. आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.” 
“तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्तानं मी वेग वेगळ्या मुलाखती देत आहे…. वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर…. आता या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे.”
अमृता म्हणाली, “…पण ट्रॉलिंगच्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते…. वेषभूशा असो… हसणं असो.. बोलणं असो…एका स्त्रीच्या प्रत्येत गोष्टी वर किती …किती बोलायचं? आणि त्याला काही सीमा का नाहीये? जे लोक स्वतःचं खरं  नाव किंवा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात? मज्जा वाटते तुम्हाला? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे…. सोशल मीडियाचा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये…. पण या वर  जे तुम्ही लिहिता… बोलता …. यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात”, अस अमृता म्हणाली. 
अमृता पुढे म्हणाली, “मी साधारणपणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करतेच…. पण कधी कधी समोरच्याला हे सांगणं गरजेचं असतं का गप्प राहणं हे दुबळेपण नाही तर ताकत आहे.” 
“अमृताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकतीच लुटेरे या सीरिजमध्ये दिसली. याशिवाय सत्यमेव जयते, राझी सारख्या काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली”, असं सांगत अमृतानं शेवट केला. (All Photo Credit : Amruta Khanvilkar Instagram)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments