तळमावले/वार्ताहर : भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पेन्सिलवर कलाकृती साकारत त्यांना अनोखे अभिवादन केले आहे डाकेवाडी (ता.पाटण) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी. यापूर्वी त्यांनी शब्दचित्रे, रेखाचित्र, रंगीबेरंगी कागदांचे तुकडे, रांगोळी, संविधान उद्देशिका इ.माध्यमातून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विविध चित्रे साकारली आहेत. 1 सेमी बाय 3 सेमी इतक्या छोटया आकारात पेन्सिलवर रेखाटलेले बाबासाहेबांचे चित्र लक्षवेधी ठरत आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी हे सुंदर चित्र तयार केले आहे. तसेच चित्राखाली पुस्तक आणि संविधान हे शब्द देखील रेखाटले आहेत. नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांत झाली आहे.
त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यामध्ये आपले वेगळेपण सिध्द केले आहे. महाराष्ट्र राज्य शासन दरबारी 6 वेळा तर विविध संस्थांकडून सुमारे 75 हून अधिक पुरस्कार देवून गौरव झाला आहे. केवळ चित्र न रेखाटता डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून निधी देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जास्तीत जास्त दिग्गज व्यक्तिमत्त्वांना त्यांची व्यक्तिचित्रे भेट देवून त्याची नोंद जागतिक स्तरावर ‘गिनीज बुक ऑफ रेकाॅर्ड’, ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ या मध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे. तसेच चित्रे भेट दिलेल्या निवडक व्यक्तींचे फोटो, आटोग्राफ, व्यक्तिचित्र असलेले आगळेवेगळे पुस्तक तयार करण्याचा मानसही त्यांनी केला आहे. डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून यापुढेही विविध चित्रांची ‘सही रे सही’ गुंफण होत राहो याच शुभेच्छा.
चौकटीत : हटके कलात्मक उपक्रम :
शब्द-रांगोळी-ठिपके-स्क्रिबलिंग-पेपर स्टेन्सिल आर्टमधून कलाकृती, खडूवर अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम-छ.शाहू महाराज-अश्टविनायक, जाळीदार पिंपळपानावर श्रीगणेश, सुपारीवर महालक्ष्मी, मावळे आणि किल्ले यांच्या नावातून शिवराय, अक्षरातून विठ्ठलाची निर्मिती, संगीत वाद्यातून लता मंगेशकर, कागदाच्या तुकडयांतून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, लहान मुलांच्या चेहऱ्यातून पंडीत नेहरु, स्पार्कलमधून बाळासाहेब ठाकरे, क्रिकेट कीटमधून सचिन तेंडूलकर, एका पानावर हरीपाठ, पोस्टकार्डवर 133 शब्दातून कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानवंदना, बोलक्या भिंती रेखाटन, कॅलिग्राफीतून जवानांना सलाम, पुस्तकांची मुखपृष्ठ, थर्मोकोल अक्षरे, अक्षर अभंग वारी उपक्रम, वहीतून पोट्रेट, आपटयाचे पान-छत्री-कागद-मास्क यावर सामाजिक संदेश, भित्ती चित्र काव्य प्रदर्शन, हस्तलिखिते, वारी पोस्टर रेखाटन, टीशर्टवर कॅलिग्राफी, अभंग चित्र वारी उपक्रम, आपटयाच्या पानावर साडेतीन शक्तीपीठे, पिंपळाचे पान कापून कलाकृती, स्वतःच्या रक्तातून स्केच, तुळशीच्या पानावर पांडूरंग, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा, 54 चित्रांची मालिका, 75 क्रांतीकारकांची स्केचेस, 81 पोस्टकार्डातून शुभेच्छा, एक सेमी आकारात कलाकृती, व्यंगचित्रे, अक्षरगणेशा