ताज्या बातम्या

राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता – अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

प्रतिनिधी(मंगेश कवडे): राज्यातील हवामानसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

त्यामुळे राज्यात पुढील 3 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच आता 3 व 4 डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे.

त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी : –

सिंधूदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top