प्रतिनिधी : स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि वृत्तपत्रीय कारकीर्दीचा झळाळता आलेख असलेले दिवंगत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीदास बोरकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्त १७ ऑगस्ट २०२४ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वर्षभर विशेष कार्यक्रमांचे गोवा आणि महाराष्ट्रात आयोजन करण्यात येत आहे.
लक्ष्मीदार बोरकर यांच्या २५ वी पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मीदास बोरकर जन्मशताब्दी समारोह समिती आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर, 2024 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे केंद्रिय राज्य मंत्री मा. श्रीपाद नाईक, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील तर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरो सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या वेळी लक्ष्मीदास बोरकर यांच्यावरील माहितीपट दाखवण्यात येणार आहे. नवप्रभाचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे, आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी हे या वेळी लक्ष्मीदास बोरकर यांच्या पत्रकारितेवर भाष्य करतील. लक्ष्मीदास बोरकर यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001 (आझाद मैदानाजवळ) येथे ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.



