ताज्या बातम्या

सावधान; महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट वादळी पाऊसाची शक्यता

प्रतिनिधी : राज्यातील हवामानात सातत्यानं बदल  होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसासह  गारपीट होत असल्याचं चित्र दित आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागानं  मुसळधार पावसाचा रेड अलर्ट  दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून, वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे. तसेच 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

विदर्भासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. तसेच वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. तर विदर्भ काही जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top