Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रश्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त...

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त…

प्रतिनिधी : आज बुधवार 10 एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन  साजरा होत आहे. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्कलकोट  येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.

स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे…! हे खास वाक्य स्वामी आपल्या भक्तांना धीर देताना म्हणत असतं. महाराष्ट्रात स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,

नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा

म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल.

पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल
ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन

गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे

मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तेथील बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments