Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रपांचगणी भाजी मार्केटला भीषण आग ; ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान,...

पांचगणी भाजी मार्केटला भीषण आग ; ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान, भरपाईची मागणी

पांचगणी(रविकांत बेलोसे)  : पांचगणी भाजी मार्केटला अचानक भीषण आग लागल्याने भाजी व्यावसायिकांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन दसऱ्याचे सणामध्ये या व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री साडेअकरा वाजनेच्या सुमारास अचानक पांचगणी च्या भाजी मंडईला आग लागली. आगीचे लोळ व धूर बाजारपेठेत पसरल्याने सर्वजण घटना स्थळी जमा झाले. काहींनी पाण्याच्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. खाजगी टँकर मागवले त्याने आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र आग आणखीनच वाढत होती. पांचगणी पालिकेच्या बंबाला पाचारण केले परंतु त्यात पाणी नसल्याचे समजल्याने महाबळेश्वर पालिकेशी संपर्क साधला. लागलीच महाबळेश्वर पालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानी ही आग आटोक्यात आली परंतु या दुकानांतील सर्व भाजी जळून खाक झाली होती.

ही आग कशाने लागली याचा अंदाज नसून ती शॉर्ट सर्किट ने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये गणेश वाडकर , संजय रजपुरे, अल्ताफ बागवान, अनिता कासूर्डे , भास्कर आंब्राळे, सिद्धेश शिंदे, प्रीती आंब्राळे ,सोहेल बागवान यांच्या भाजीपाला तसेच दुकानांचे सुमारे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
या व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

२०१५ मध्येही दिवाळी हंगामात फटक्याने अशाच पद्धतीने आग लागली होती. त्यावेळीही अशीच मोठी हानी झाली होती. परंतु त्यावेळी कसलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. आता दसऱ्याच्या दिवसात अशीच आगीची पुनरावृत्ती झाली आहे. यावेळी तरी या व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. परंतु आता तरी या व्यवसायिकांना न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments