Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रसातारा शहरात पोलिस बदलीच्या कारवाईबाबत पोलीस मित्रांचे मौन ….

सातारा शहरात पोलिस बदलीच्या कारवाईबाबत पोलीस मित्रांचे मौन ….


सातारा(अजित जगताप) : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सक्षम असतात. परंतु, साताऱ्यात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी थेट पालकमंत्र्यांचा बंगला गाठला. त्यामुळे चार पोलीस कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई झाली. याबाबत नवलाईची गोष्ट म्हणजे साताऱ्यातील पोलीस मित्रांचे मौन बरेच बोलके ठरले आहे. साताऱ्यातील दोन व लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अशा चार पोलिसांवर बदलीची कारवाई झाल्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरलेला आहे.

याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील सार्वजनिक उत्सवामध्ये कर्तव्यदक्ष भावनेतून सर्वच पोलीस यंत्रणा काम करत असतात. त्यांच्या जोडीला होमगार्ड व स्वयंसेवक असतात.
साताऱ्यातील काही पोलीस मित्र संघटना अशा वेळेला पोलीस बांधवांना कर्तव्यदक्ष बजावल्याबद्दल गौरव करण्यात धन्यता मानते. चांगल्या कामांसाठी पोलिसांचा गौरव करणे व त्यांचे मनोधैर्य वाढवणे. हे कौतुकास्पद बाब आहे. याच पोलीस बांधवांवरून जेव्हा अन्याय होतो. त्या वेळेला कोणी आवाज उठवत नाहीत .हे सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळाले आहे. सातारा जिल्ह्याचे वजनदार मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका शिवतीर्थ नजीक असलेल्या कोयनादौलत बंगल्यासमोर दिव्यांग महिलेवर झालेल्या अन्यायाबाबत दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था तसेच फलटण तालुक्यातील एका दारू परवाना याबाबत दिव्यांग बांधव व फलटण तालुक्यातील ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. हे आंदोलन भडकू नये. म्हणून पोलीस यंत्रणेने अत्यंत संयम राखला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या दिवशीच साताऱ्यात असा प्रकार घडल्यामुळे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा फर्माना काढला. आणि त्याची त्वरित पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अंमलबजावणी केली. परंतु मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला. आता ही बदली रद्द व्हावी अशी आता मागणी पुढे आलेली आहे. वास्तविक पाहता बदली बाबत पोलीस दलातील प्रशासकीय कारभार असला तरी याबाबत पोलीस मित्रांनी मौन धारण केले. त्यांच्यापर्यंत माहिती जाऊन सुद्धा त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, साताऱ्यात याबाबत दबक्या आवाजात चर्चा होऊ लागलेली आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार पाहणारे पोलीस अधीक्षक शहीद अशोक कामटे, सुरेश खोपडे, के एम एम प्रसन्ना, संदीप पाटील व अन्य वरिष्ठ आय.पी.एस. अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीची आजही आठवण होते. सध्याचे पोलीस अधीक्षक यांच्या काळात सातारा बस स्थानकात पोलिसांना झालेली मारहाण तसेच जातीय दंगली व आंदोलन आणि इतर बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत. वास्तविक पाहता पोलीस दलाचे महत्व कधीही कमी होऊ शकत नाही. सध्या प्रशासकीय कारभार असून सुद्धा राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने सातारा पोलीस यांच्या बद्दल आता विरोधी पक्ष नेते सुद्धा जाहीर रित्या सभेमधून टीका करू लागलेले आहेत. सातारचे पोलीस अधीक्षक यांच्या बद्दल ते पांडू हवालदार सारखे काम करतात. अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष शेख यांनी केली होती. त्याला प्रसार माध्यमाने ही चांगलीच प्रसिद्धी दिली. आता पालकमंत्र्यांच्या बंगल्यासमोर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या बदलीच्या प्रकरणाबाबत सध्या पोलीस दलातील कर्तव्यदक्ष व प्रामाणिक पोलीस बांधवांनीच आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. हे ही स्पष्ट झाले आहे. सामान्य माणसांशी कायद्याची भाषा वापरणारे साताऱ्यात चार पोलिसांची बदली कायदेशीर झाली का? मग बदलीबाबत गप्प का? अशी विचारणा आता सर्व स्तरातून होऊ लागलेली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments