मुंबई (उत्कर्ष एस. गुडेकर ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या बोंड्ये गावच्या माजी सरपंच, समाजसेविका,अंगणवाडी सेविका ललिता गुडेकर यांच्या मातोश्री वासंती वसंत गुडेकर यांचे शुक्रवार दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वा. दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. वासंती वसंत गुडेकर यांच्या निधनाने गुडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर बोंड्ये गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर आज शनिवारी(दि. २१सप्टेंबर ) सकाळी बोंड्ये गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी पंचक्रोशी मधील विविध क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे, दिर असा मोठा परिवार आहे.बोंड्ये ग्रामविकास मंडळ,जावई एकनाथ कदम, कन्या अनिता कदम व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोहन कदम, आंगवली रेवाळेवाडी येथील भावकी दत्ताराम गुडेकर, तुकाराम गुडेकर,पत्रकार शांताराम गुडेकर आणि बंधू परिवार यांच्याकडून वासंती वसंत गुडेकर यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.रविवारी(दि. २२सप्टेंबर ) माती सावरणे कार्यक्रम होणार असून बारावे,तेरावे कार्यविधी रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी बोंड्ये येथील त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.
बोंड्ये गावच्या माजी सरपंच ललिता गुडेकर यांना मातृशोक; मातोश्री वासंती गुडेकर यांचे निधन
RELATED ARTICLES