ताज्या बातम्या

सावधान ड्रायव्हर कंडक्टर;धारावीत वाहकावर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी – धारावी बस डेपो मध्ये कार्यरत असलेले वाहक बस ११२७२७ अशोक डागळे यांच्यावर रुट क्रमांक ७ वर काम करत असताना चोरट्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्यामुळे बस वाहक- चालक हे पूर्णपणे हादरून गेले आहेत. अशोक डागळे हे सद्या लोकमान्य टिळक रुग्णालय (सायन हॉस्पिटल) येथे उपचार घेत आहेत. बस मध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरटा हा चोरी पाकिटमार करण्यासाठी गाडीत चढला असता त्याला हटकल्यामुळे त्याला राग आला व त्यांनी मागेपुढे न पाहता वाहक अशोक डागळे यांच्यावर हल्ला करून पळ काढला आहे.सदरची घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा राष्ट्रीय कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित गुन्हेगाराला त्वरित अटक करावी त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील केली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top